महाराष्ट्र

PUBG साठी डाटा अपुरा पडल्याच्या रागातून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील घटना

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : पब्जी (PUBG) खेळण्यासाठी डाटा अपुरा पडल्याच्या रागातून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे ही घटना घडली असून अजय सुरेश माळी (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अजयला नुकताच त्याच्या वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, पब्जी खेळण्यासाठी या मोबाईल मधील डाटा संपला व वडिलांनी रिचार्ज न करून दिल्याने या रागातून अजय 10 जुलै रोजी घरातून निघून गेला. याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद देखील करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसानंतर अजयचा मृतदेह एका विहिरीत आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. पब्जी खेळण्यासाठी रिचार्ज करून न दिल्याच्या रागातून अजयने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य