सचिन वाझे प्रकरणात विरोधकांनी रान उठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली असताना आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी हि मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या दबावामुळे सचिन वाझेवर कारवाई करणे व त्यांचा पूर्वेतिहास पाहता त्यांनी राणे यांनी हि मागणी केली आहे.
माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे, मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेप्रकरणात एटीएसने जी कारवाई करायला हवी, ती होताना दिसत नसल्याचे सांगितले. माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पुरावे मिळत असतील, तर माझा दावा आहे पोलिसांकडे यापेक्षा जास्त पुरावे असतील. एटीएस ही चांगली यंत्रणा आहे. ते चांगलं काम करतात. पण त्यांच्यावर दबाव आहे का? असं वाटतं असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.