cock Team Lokshahi
महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच! भंडाऱ्यात कोंबडा झाला अट्टल दारुडा

रोज दारू घेतल्या शिवाय कोंबडयाच्या घशात जात नाही अन्न-पाणी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर| भंडारा : आजपर्यंत तुम्ही पुरुषाला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल. काही प्रसंगी महिलांचेही नाव समोर आले. मात्र, यात तुम्ही कोंबडयाला दारुचे व्यसन लागल्याचे ऐकले आहे का? नाही ना. होय आम्ही खर सांगतोय. भंडाऱ्यात चक्क एका कोंबडयाला दारुचे व्यसन जडले आहे. इतकेच काय दारू घेतल्याशिवाय कोंबड्याच्या घशात अन्न-पाणीही जात नाही. आपल्या प्रिय कोंबडयाच्या व्यसनाधीनतेमुळे मालक चिंतेत पडला असून दारू सोडण्यासाठी विविध उपाय करत आहे.

भंडारा शहरानजीक असलेल्या पिंपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे हे शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातीचे कोंबडे आहेत. यामधील एका कोंबड्याला दारुचे व्यसन जडले आहे. दारु घेतल्याशिवाय कोंबड्याच्या घशात अन्न-पाणीही जात नाही. यामागील कारणही विशेष आहे.

मागील वर्षी कोंबड़ामध्ये ‘मरी’ रोग आला होता. भाऊ कातोरे यांच्या कोंबडयाला मरी रोग जडल्याने कोंबडयाने खाणे-पिणे सोडले होते. कोणीतरी सांगितले म्हणून मरी रोगावर उपाय म्हणून त्यांनी काही महिने मोहफूलाची देशी दारू कोंबड्याला पाजली. मात्र, मोहफुलाची दारू मिळेनासी झाल्यावर त्यांनी विदेशीचा उतारा देणे सुरु केले. सततच्या दारू सेवनाने त्यांच्या कोंबडयाला दारुचे व्यसन जडले असून दारू पिल्याशिवाय कोंबडा पाणी प्यायलाही तयार होत नाही. आता निर्व्यसनी मालकही कोंबडयाला वाचविण्यासाठी त्यांचे व्यसन डोक्यावर घेऊन आले. या कोबडयांला रोज 45 मिलीचा पॅक लागत असून त्याच्याशिवाय अन्न-पाणीही कोंबडा घेत नाही. आता दर महिन्याला मालकाला 2 हजार रूपयांचा फटका बसत असून दारू सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी दारू लपून आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या मालकाने कोंबडयाचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून पशुवैद्यकिय दवाखान्यात पायपीट सुरु केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा