थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Three-language policy committee ) त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असून या समितीला 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या समितीला मुदतवाढ दिली असून प्रचार काळात भाषावाद मुद्दा वादग्रस्त ठरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Summery
त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ
प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न
समितीला 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत