महाराष्ट्र

सोलापूर | ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृताला अग्नी

Published by : Lokshahi News

माणूसकीला काळीमा फासणारी घटना माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव येथे समोर आली आहे. दलित समाजातील मृत व्यक्तीवर गावातील लोकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने मृताच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले आहेत. याप्रकरणी सात जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशियत आरोपींना अटक केली आहे.

माळेवाडी -बोरगाव येथील मातंग समाजातील एक व्यक्तीचे काल पहाटे दोन वाजता निधन झाले होते. दरम्यान, गावातील काही लोकांनी मृत व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला होता. हा वाद सायंकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे मृत्युनंतरही त्या व्यक्तीला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

सायंकाळी मातंग समाजातील काही लोकांनी पुढाकार घेवून ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृतावर अत्यंस्कार केले. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात चाललयं काय, असा संतप्त सवाल आता उपपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा