महाराष्ट्र

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी होणार कार्यान्वित – मंत्री यशोमती ठाकूर

Published by : Lokshahi News

राज्य महिला आयोगाची 6 विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी (8 मार्च) कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत.

अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत, अशी संकल्पना मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी कार्यान्वित करण्यात येत आहेत.

मुंबई हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे अत्याचार पीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर संपर्क साधणे कठीण जात होते. तथापि, आता विभागीय कार्यालये सुरू होत असल्यामुळे अशा महिलांना दिलासा मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या, विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागात सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचे सहाय्य घेण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर

Team India's New Jersey Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर 'ड्रीम 11' नाही तर आता ही स्पॉन्सर म्हणून दिसणार 'ही' कंपनी