महाराष्ट्र

घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केले मालकाच्या घरातून लाखोंचे दागिने लंपास

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रिध्देश हातीम | मुंबई : घरकाम करणाऱ्या मोलकरणीने मालकाच्या घरातून सात लाखांचे दागिने चोरी केले आहेत. कांदिवली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपी महिलेचे नाव दिपीका संतोष पवार (वय ४०) आहे.

माहितीनुसार, अनुजा जयेश मोदी या महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे राहत होत्या. आरोपी त्यांच्याकडे मागच्या चार महिन्यापासून मोलकरीण म्हणून काम करत होती. घरात काम करत असताना मोलकरणीने घराच्या कपाटातून ७ लाख ५८ हजार ५०० किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच अनुजा मोदी यांनी पोली स्थानकात तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे व पथकाने सुरु केला.

महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) येथून आरोपी महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून गुन्हयातील चोरी केलेली मुद्देमाल तिच्या मिरा भायंदर येथील राहात्या पत्त्यावरून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. महिलेने चोरी केलेली मालमत्ता पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली. दिपीका संतोष पवार सध्या पोलीस कोठडी आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा

Sahil Khan Arrested : छत्तीसगड येथून अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं

International Dance Day 2024: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधीपासून साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

"नुसतं उभं राहण्यात मजा नाही, पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे"; पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं