कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकाच्या कारची आणि ट्रॅव्हल्सची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास बीड परळी महामार्गावर वडवणी नजीक झाला.
दरम्यान देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीडच्या दिशेने आपल्या स्विफ्ट गाडीने कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.