थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Murlidhar Mohol) राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभांना सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर 'पुण्याचा महापौर हा भाजपचाच होणार'असे पुण्यातील भाजपाच्या प्रचारसभेत मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुणेकरांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण जे काही काम केलं असेल ते या निवडणुकीच्या निमित्ताने आपण जनतेसमोर ठेवूया. मला विश्वास आहे की पुन्हा एकदा पुणेकर जनता ही आपल्याला समर्थन देईल."
"आपल्यासोबत राहील. पुणेकर जनता ही आपल्या सोबत आहे. आपला विजय निश्चित आहे. 100 टक्के आपला पुण्याचा महापौर पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीचा होईल. पण हा विचार केवळ मनामध्ये न ठेवता आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहचले पाहिजे." असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.