महाराष्ट्र

साठवण तलाव फुटण्याची शक्यता; तीन गावांना धोका

Published by : Lokshahi News

बालाजी सुरवसे | उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला येथील साठवण तलावाला लागलेल्या गळतीमुळे हा तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाशी तालुक्यातील या तलावाखालील हातोला, रुई, जेबा या गावांना धोका असल्यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी थेट साठवण तलावावरूनच आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महत्वाची बाब म्हणजे हे साठवण तलाव कधीही फुटू शकत. आणि या तलावाचा तीन गावांना धोका आहे. तलाव फुटल्यावर तीन गाव वाहून जावू शकता. हा लढा २०१२ पासून येथील शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान तत्कालीन उप जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले होते, या संबंधित अधिकार्यावर ४५ दिवसांत कारवाई करू. आणि या तलावाची दुरुस्ठी लवकरात लवकर करू. परंतु यांच्यावर अद्याप काही कारवाही झालेली नाही. हे गावकऱ्यांचे उपोषण आरपारची लढाई आहे. हा तलाव तत्काळ दुरुस्थ करण्यात यावा अशी शेतकरी, ग्रामस्थ यांची मागणी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप