थोडक्यात
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार आज होणार
शासनाकडून यासंदर्भात जीआर काढण्यात आला
पगाराचे 471 कोटी खात्यात जमा झाल्याची माहिती
(ST Corporation Employees ) एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा आज पगार होणार आहे. आज सोमवारी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार होणार असून पगाराचे 471 कोटी खात्यात जमा झाल्याची माहिती मिळत आहे.
शासनाकडून यासंदर्भात जीआर काढण्यात आला . एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे पगार रखडल्याची माहिती मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत होता.
यासंदर्भात अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. मात्र आता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आज त्यांचा पगार होणार आहे.