Election Team Lokshahi
महाराष्ट्र

चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार! मतदारांना पैसे वाटप करताना तिघांना रंगेहाथ पकडलं

वाकड पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चिंचवड : शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, रोड शोचा धडाका लावला होता. या पोटनिवडणुकीचा प्रचार युती आणि आघाडीतील आरोप-प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटांनी जास्त गाजला. निवडणूक प्रचार संपल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आता उद्या होणार्‍या मतदानाच्या तयारीला लागले आहेत. परंतु, चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चिंचवड विधानसभेत मतदारांना पैसे वाटप करताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांचं बंडलनुसार असे 1 लाख 70 हजार रुपये आणि भाजपच्या काही स्लिप आढळल्या आहेत. रहाटणी भागात साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रहाटणी भागातच राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचं घर आणि कार्यालय ही आहे. त्याच परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तिघांना एका घरात पैसे वाटप करताना पकडलं आणि त्याचं चित्रिकरणही केलं. निवडणूक आयोगाच्या फ्लायइंग स्कॉडने वाकड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र (NC) तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत. उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर, मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी