महाराष्ट्र

वाझेचा विषय उद्या वाजणार, पुढे काय ?

Published by : Lokshahi News

उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून. आजच्या दिवसाचा घटनाक्रम पाहता उद्या देखील मनसुख हिरेन प्रकरणात वाझे यांचा विषय विरोधी पक्ष नेते धरून ठेवतील . तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष अन्वय नाईक आणि डेलकर यांचा विषय धरून राहतील. यासर्वापुढे जावून अधिवेशनचे सूप वाजल्यानंतर हिरेन प्रकरणी विरोधक किती आक्रमक असणार हे पाहावं लागेल.

या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील हत्या व आत्महत्या प्रकरणाने चांगलाच पेटला होता. सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांकडून एकमेंकावर या गंभीर प्रकरणाचे आरोप करून घेरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सध्या चर्चेत असलेले मुकेश अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या गाडीचा मालक मनसुख हिरेन प्रकरण, याच प्रकरणात चर्चेत असलेले सचिन वाझे. तसेच मोहन डेलकर व अन्वय नाईक प्रकरणांनी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. दरम्यान आज विधानसभेतील गदारोळामुळे 9 वेळा सभागृह तहकूब करण्यात आला.

अधिवेशना दिवसाचा क्रम

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच सभागृहात वाचून दाखवला. वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

या पार्श्वभूमीवर मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. एटीएस याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा एटीएस कडे द्या. तपास योग्य होईल असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणी माझी चौकशी करा असे देखील ते यावेळी म्हणले. दरम्यान आज विधानसभेतील गदारोळामुळे 9 वेळा सभागृह तहकूब करण्यात आला. तर शेवटच्या गदारोळामुळे उद्या सकाळपर्यत विधानसभा स्थगित करण्यात आली.

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी डेलकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची भेट घेतली. यावेळी आपला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, तपास यंत्रणा योग्य तो तापस करतील,असे मत डेलकर यांच्या मुलाने मांडले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर