महाराष्ट्र

नोकर मालक झाला म्हणून माटुंग्यात भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण

Published by : Lokshahi News

मुंबईतील प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतो. माटुंग्यात भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना दुकानात घुसून भाजी विक्रेत्याला मारहाण केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोन व्यक्ती दुकानाजवळ येतात आणि भाजी विक्रेत्यासोबच बोलू लागतात. दोघे भाजी विक्रेत्याला आतमध्ये नेतात आणि मारहाण करण्यास सुरुवात करतात. यावेळी रस्त्यावरुन जाणारी एक वयस्कर व्यक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण आरोपी कोणाचंही ऐकत नाहीत.

मारहाणीचं कारण काय?
एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपींधील एकाने हे दुकान भाड्याने घेतलं होतं. यावेळी पीडित व्यक्ती तिथे काम करत होता. नंतर पीडित व्यक्तीने दुकानाच्या मालकासोबत बोलून दुकान भाड्याने चालवायला घेतलं होतं. यामुळे संतापलेल्या आरोपीने मारहाण केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kalyan News : कल्याणमधील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळली; दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान, तर जीवितहानी...

आजचा सुविचार

Zakir Khan : न्यूयॉर्कमध्ये जाकिर खानचा इतिहास रचणारा परफॉर्मन्स; हिंदीत स्टँड-अप करणारा पहिला भारतीय कॉमेडियन

Vladimir Putin and Narendra Modi ट्रम्प यांना चिमटा! पुतिन-मोदी यांचं समीकरण घडवतंय नवा राजकीय खेळ?