महाराष्ट्र

नागपूर मधील टिक टॉक स्टार ने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

Published by : Lokshahi News

नागपूरमध्ये टॉक टिक स्टार ने अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या करून अपहरण करून तिचे शारीरिक शोषण करून तिचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पंधरा दिवसानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेमध्ये टिक टॉक स्टार आणि त्याच्या साथीदाराला अटक केलेली आहे . अल्पवयीन मुलीला जबरीने दुचाकी वाहनावर बसवून तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या समीर खान (१९) रा. बंगाली पंजा, पाचपावली आणि मो. शकिन मो. सिद्धीकी (२५) र यशोधरानगर, नागपूर या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या मुलीचे अपहरण करणाऱ्यांपैकी एका आरोपीने तिचे बरेचदा लैंगिक शोषणही केल्याचे मुलीकडून पोलिसांना सांगण्यात आले.


आरोपी समीरची अल्पवयीन मुलीसोबत ओळख होती. दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून आरोपी समीरने मो. शकिनच्या मदतीने पीडित मुलीला १८ जून २०२१ रोजी जबरीने दुचाकीवर कमाल चौकातून बसवून शिवीगाळ व मारहाण करतानाचा व्हिडीओ तयार केला. तो इंन्स्टाग्रामवर अपलोड केला. गुन्हेशाखेने मुलीचा शोध सुरू केला. मुलीची माहिती कळल्यावर तिला पोलिसांनी विश्वासात घेतले. आरोपी समीरसोबत तिची सोशल मीडियावरून ओळख झाली. समीरने ओळख वाढवत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अपहरणानंतर मुलीने पाचपावली पोलिसांना तक्रार दिल्याने आरोपींवर गुन्हा दाखल केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा