महाराष्ट्र

राष्ट्रवादी जोमात, शिंदे सरकार कोमात! वाहून गेलेला पूल माजी पालकमंत्र्याने 5 तासात उभारला

माजी पालकमंत्री व आमदार बाळासाहेब पाटलांनी निभावले पालकत्व

Published by : Team Lokshahi

प्रशांत जगताप | सातारा : शिंदे सरकारला (Shinde Government) एक महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. यामुळे राज्याला अद्यापही कृषी मंत्री मिळाला नाही. तर पालकमंत्र्यांचीही घोषणा झाली नसल्याने आपल्या समस्या कोणासमोर मांडाव्यात, असा प्रश्न जनतेसमोर आहे. अशात सरकारची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या माजी पालकमंत्र्याने आपले पालकत्व निभावले आहे. याचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड, एकंबे, शिरंबे आणि कोरेगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेला होता. यामुळे नागरिकांना धोकादायक पद्धतीने ओढा ओलांडून जावं लागत होते. परिसरातील नागरिकांना 24 किलोमीटर प्रवास करून जावे लागत असल्याने मोठी फरपट होताना पाहायला मिळत होती. याबाबत गावातीलच ग्रामस्थांनी माजी पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांना याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर पाठवून माहिती दिली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या मदतीने कामाला सुरुवात केली. ओढ्यात सिमेंटच्या मोठी नळीपाईप, दगड, गोटे मुरूम टाकून पूल बांधण्यात आला.आणि अवघ्या काही तासातच पुन्हा हा पुल वर्दळीसाठी सुरू करण्यात यश आले आहे.

दरम्यान, अनेक राजकीय व्यक्ती आपले सरकार गेल्यानंतर केवळ टीका-टीप्पण्यांचे काम करते. परंतु, अशात महाविकास आघाडीची सत्ता नसनाही राजकारण बाजूला ठेवून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पालकत्व निभावले. यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?