Nagpur  
महाराष्ट्र

Nagpur : नागपूर शहरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटीने वाढ

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Nagpur ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच आता नागपूर शहरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर आणि भाजप उमेदवार माया ईवणाते यांची संपत्ती गेल्यावेळी 2 कोटी 90 लाख इतकी होती आता 4 कोटी 6 लाख 20 रुपये आहे. माजी परिवहन सभापती बंटी कुकडे यांची मालमत्ता गेल्या निवडणुकीत 21 लाखांची होती आता त्यांच्याकडे 95 लाखाची संपत्ती आहे. बंडू राऊत यांची संपत्ती एक कोटी सात लाखांची गेल्या निवडणुकीत होती आता ती दोन कोटी 23 लाख 82 हजार रुपयांवर गेल्याची माहिती मिळत आहे.

धर्मपाल मेश्राम यांच्याकडे मागील निवडणुकीत तीन कोटी तेरा लाख 49 हजारची संपत्ती होती ती आता चार कोटी 65 लाख 66 हजार 773 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यासोबतच माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या संपत्तीत 13 वर्षात दहापटीपेक्षा अधिक वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • नागपूर शहरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटीने वाढ

  • माया ईवणाते- गेल्यावेळी 2 कोटी 90 लाख,आता 4 कोटी 6 लाख 20 रुपये

  • बंटी कुकडे- गेल्या निवडणुकीत 21 लाख, आता 95 लाखाची संपत्ती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा