महाराष्ट्र

वसईतल्या मॅकडॉनल्डसमधल्या चोरीचा उलगडा; कर्मचारीचं निघाला चोर

Published by : Lokshahi News

सदीप गायकवाड, वसई | वसईच्या मॅकडॉनल्डस् मध्ये झालेली चोरी अखेर वसईच्या माणिकपूर पोलिसांनी उघड केली आहे. पोलिसांनी सीसीटीवीच्या मदतीने याप्रकरणात आलोक सिंग आणि जितेंद्रकुमार सिंग या दोघांना बेडया ठोकल्या आहेत. यातील अलोक सिंग हा मॅकडॉनल्डस् च्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होता. यातील तिसरा आरोपी अल्पवयीन असून तो फरार आहे.

वसईच्या अग्रवाल सिटी येथे असलेल्या मॅकडॉनल्डस् या दुकानात दिनांक ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास चोरी झाली होती. पहिल्या मजल्यावरील डॉवरमधून चोरटयांनी सव्वा दोन लाख २१ हजाराची रोकड लंपास केली होती. चोरटयांनी दुकानाच्या मागून आत शिरुन, दुस-या मजल्यावर असलेल्या डॉवर मधून ही रोकड लंपास केली होती. या चोरीत तीन चोरटे सीसीटीवीत कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीवीच्या मदतीने याप्रकरणात आलोक सिंग आणि जितेंद्रकुमार सिंग या दोघांना बेडया ठोकल्या आहेत. यातील अलोक सिंग हा २०१९ साली या मॅकडॉनल्डस् च्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळेच त्याला कोणत्या डॉवरमध्ये रोखड ठेवली जाते. त्याची चावी कुठल्या डॉवरमध्ये असते ते माहित होते.

 यातील तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. आणि तो फरार आहे. या तिघांनीही सर्व पैस आपआपल्या अय्याशीच्या सामानासाठी उडवले असल्याच समोर आलं आहे. त्यातील ५१ हजार रुपये फक्त पोलिसांना रिकवर करता आले आहेत.

या घटनेचा सीसीटीवी हाती लागल्यावर त्यात चोरटयांना रोखड मिळाल्यानंतर यातील दोन चोर एकमेकांना मिठ्ठी मारुन, जसं मोठं काम फत्ते केल्याच्या आविर्भावात आपला आनंद व्यक्त करत होते. माञ त्यांचा हा आनंद काही वेळेसाठीच राहिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा