दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडला होता. यानंतर संपुर्ण जग हादरले आहे. महाराष्ट्रात सुद्धा आरोग्य विभार सतर्क झाले असून नवीन नियमावली जारी केली. तसेच राज्यास पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सूरू झाली आहे. यासह राज्यात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल हजार लोक आल्याची माहिती पर्य़टन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. या सर्व प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली.
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये असे राजेश टोपे म्हणाले.
ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.