बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता पुणे आणि पिंपरी – चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीला सुरूवात झाली असून काल रात्री अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे यांच्यात गुप्त बैठक झाली.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाला सुरूवात झाल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. शरद पवार यांची एक भूमिका असते. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचे आयुष्य घालवलं आहे. आम्हीसुद्धा अनेकदा त्यांच्या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत उतरलेलो आहोत."
"त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे. हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल, मला असं वाटत नाही. मी जे काही पवार साहेबांना ओळखतो ते विलीनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही. मी एकदा पवार साहेबांना हा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी अशक्य आहे सांगितले." असे संजय राऊत म्हणाले.
Summary
अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे यांच्यात गुप्त बैठक
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनिकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
"दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही"