(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या मुद्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काल अधिवेशनात नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याविरोधात विरोधक पायऱ्यांवर हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्यावर आजसुद्धा सभागृहात विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्वाचे आहे.