महाराष्ट्र

१ जूनपासून PF अकाऊंटवर लागू होणार ‘हा’ नियम

Published by : Lokshahi News

कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने (EPFO) आपल्या खातेधारकांसाठी नियमांत काही बदल केले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाचं पीफ खातं आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी पीएफ खातं आधारच्या मार्फत लिंक करावं यासाठी त्यांना माहिती देण्याची जबाबदारी कंपनीकडे असेल. जर कर्मचाऱ्याने असं केलं नाही तर त्याला नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे. जसं की कंपनीकडून पीएफ खात्यात दिलं जाणारं योगदान थांबवलं जाऊ शकतं. कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे नवा नियम?
सोशल सेक्युरिटी कोड २०२० (Social Security Code) च्या कलम १४२ अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पष्टपणे जर एखादं पीएफ खातं आधारसोबत लिंक नसेल तर त्याचा ECR – इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (Electronic Challan cum Return) भरला जाणार नाही. याचा अर्थ असा की, पीएफ खातेधारकाला कंपनीचा भाग मिळणार नाही. खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना फक्त आपल्याकडून होणारं योगदानच दिसेल.

EPF अकाऊंटला आधारशी लिंक कसं करायचं?
जर तुम्ही अद्यापही आपलं पीएफ खातं आधारसोबत लिंक केलं नसेल तर EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वात प्रथम आधारसोबत लिंक करा आणि UAN देखील आधार व्हेरिफाईड करुन घ्या. यामुळे आपल्या खात्यात आधीप्रमाणे पीएफ योगदान कोणत्याही अडथळ्याविना सुरु राहील.

१) सर्वात प्रथम EPFO ची वेबसाईट www.epfindia.gov.in वर लॉग इन करा.
२) यानंतर Online Services वर जाऊन e-KYC Portal आणि नंतर link UAN aadhar वर क्लिक करा.
३) तुम्हाला तुमचा UAN क्रमांक आणि UAN अकाऊंटवरुन रजिस्टर मोबाइल नंबर अपलोड करायचा आहे.
४) तुमच्या मोबाइल नंबरवर OTP क्रमांक येईल.
५) आधारच्या बॉक्समध्ये आपला १२ डिजिट आधार क्रमांक भरा आणि सबमिट करा.
६) यानंतर Proceed to OTP verification पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
७) यानंतर आधारची माहिती पडताळण्यासाठी आधारशी जोडला असलेला मोबाइल क्रमांक किंवा मेलवर ओटीपी जनरेट करावा लागेल.
८) पडताळणी केल्यानंतर तुमचं आधार पीएफ खात्यासोबत लिंक होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच