थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ambadas Danve) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केला आहे. अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही मंत्री व अधिकारी उमेदवारांना फोन करून दबाव टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रत्येक फोनचा हिशोब ठेवतो आहे. हे थांबवा, अन्यथा गाढवावरून मिरवणूक काढली नाही तर माझे नाव अंबादास दानवे नाही,” असा सज्जड इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या
मंत्री, अधिकारी उमेदवारांना फोन करून दबाव टाकतात
ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप