panvel  team lokshahi
महाराष्ट्र

ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या वस्तु चोरून नेणाऱ्या तिघांना अटक; घटना CCTV मध्ये कैद

Published by : Team Lokshahi

हर्षल भदाणे पाटील | पनवेल : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स चालकाला दागिने दाखवायला सांगायचे आणि ते चोरून न्यायचे याबाबत खांदेश्वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कामोठे येथील राधिका ज्वेलर्स नावाचे दुकान असून यावळी आरोपींनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून या दुकानात अडतीस ग्राम सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. तर खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील कृष्णदेव सूर्यवंशी यांच्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये दोन अनोळखी महिला सोन्याच्या डोरले यांच्या वाट्या खरेदी करण्यासाठी आल्या.

वाट्या दाखवत असताना ती पाहिली व आवडली नाही, असे बोलून वस्तू ठेवल्यासारखे करून त्या निघून गेल्या. दुकानातील स्टॉक चेक केला असता वीस हजार रुपये किमतीची सोन्याची वाटी सापडून आली नाही. याबाबत खांदेश्वर आणि कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका स्मिता जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला, निलेश पवार, योगेश्वर ठाकूर, तुषार चौधरी व त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

कामोठे पोलिसांनी बदलापूर येथून संगीता सुदर्शन खीची (वय 49), सुनील प्रकाश साळुंखे (वय 41) व विनोद प्रकाश साळुंखे (48 सर्व रा. बदलापूर, कात्रप) यांना अटक केली. त्यांच्याकडून कामोठे, खांदेश्वर आणि डोंगरी पोलीस स्टेशन येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून तिन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा