थोडक्यात
अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात
भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल
अमोल नांदूरकर, अकोला
( Akola Accident ) अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन पुरुष, एक महिला जागीच ठार झाले तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ हा अपघात झाला. गाडी बंद पडल्याने अपघात ग्रस्त रस्त्यावर उभे असताना एका अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार जणांना धडक दिली.
या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.