शिर्डी जवळील सावळीविहीर गावातील धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डीत एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या केली. जावयाने केली पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली. धारदार शस्राने वार करत तिघांची निर्घृण हत्या केली. तर सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी आहे. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.