Mantralaya Team Lokshahi
महाराष्ट्र

मंत्रालयासमोर एकाच दिवसात तीन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; 63 वर्षीय महिलेचा मृत्यू

एका घटनेमध्ये 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर अन्य दोघांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मीनाक्षी म्हात्रे | मुंबई : मंत्रालयात एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे. यातील एका घटनेमध्ये 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर अन्य दोघांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

शीतल गादेकर (वय 63) महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेची धुळ्यातील नऊ गुंठे जागा एका व्यक्तीने हडप केली होती. याविरोधात ती सरकार दरबारी न्याय मागण्यास आली होती. नैराशेतून महिलेने काल (28 मार्च) मंत्रालयात कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या घटनेत संगीता डवरे या महिलेचे पती नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात जखमी महिलेच्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत तक्रार नोंदवली होती. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने संगीता डवरे यांनी काल मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. संगीता यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तर, पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. अपंगांना अनुदानात वाढ करून देण्यात यावी यासाठी रमेश मोहिते अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर