महाराष्ट्र

Wardha: शेतात काम करताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; ताडगाव परिसरात भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव शिवारात शेतात शेतकरी काम करत असताना अचानक वाघाने हल्ला करून राखीव क्षेत्रात ओढत जीवाशी ठार केले.

Published by : shweta walge

भूपेश बारंगे,वर्धा; जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव शिवारात शेतात शेतकरी काम करत असताना अचानक वाघाने हल्ला करून राखीव क्षेत्रात ओढत जीवाशी ठार केले. ही घटना प्रत्यक्ष बंडू वाघ आणि प्रदीप दडमल यांनी बघितल्याने तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्यासह वनकर्मचारी पाहणी केली असता, शेतकरी गोविंद लहानू चौधरी वय 62 वर्ष यांचा राखीव कक्ष क्रमांक 323 मध्ये आज सकाळी 11 वाजता घडली. मृतक गोविंद चौधरी यांच्या मानेवर वाघाच्या दाताचे निशाण आढळून आले. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वनविभागाला माहिती पडताच घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दहीभाते, नायब तहसीलदार संजय कटपातळ मौका तपासणी करून पंचनामा करण्यात आला.

मृतकाच्या कुटुंबाला 25 लाखाचा धनादेश

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोविंद चौधरी यांच्या पत्नीला तात्काळ वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी 10 लाखाचा धनादेश देऊन मदत देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाला 25 लाखाचा मदत देण्यात येत असून त्यातून दहा लाख देण्यात आला आहे.

घटनास्थळी ट्रॅप कॅमेरातून वाघावर देखरेख

कक्ष क्रमांक 323 मध्ये वाघाचे अस्तित्व असल्याने याठिकाणी आजूबाजूला ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.या कॅमेरेने वाघाच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. वनपाल व वनरक्षक यांचे गस्तीपथक तयार केले असून गस्ती राबविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा