महाराष्ट्र

शेतशिवारात वाघाने केली गायीची शिकार

Published by : Lokshahi News

नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार गावापरिसरात वाघाने हल्ला करून गाईला ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली.

कॅमेऱ्यात हा थरार दृष्य कैद झाला असला तरी वनविभागाने 'गोरेगाव तालुक्यात वाघ नाहीच', असे सांगीतले. त्यामुळे वनविभागाच्या भुमिकेवर नागरीकांचा संशय निर्माण झाला आहे.

मुंडीपार जंगल परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामेदेखील करणे कठिण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली असली तरी वनविभाग कुंभकर्णी झोपेत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी