महाराष्ट्र

खड्डयांविरोधात आम आदमी पार्टीचे टिटवाळ्यात अनोखे आंदोलन

Published by : Lokshahi News

कल्याण-टिटवाळ्याला जोडणारा मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. टिटवाळा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण टिटवाळा रोडवरील बल्यानी चौकात एक अनोखे आंदोलन केले.

आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दारू पे बीक जाओंगे ऐसा रस्ता पाओंगे, साडी पे बिक जाओंगे ऐसा रस्ता पाओंगे अशा घोषणा देत बल्यानी ते टिटवाळा रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी केडीएमसीकडून रस्त्याची डागडुजी तत्काळ हाती घेतली नाही तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून