थोडक्यात
राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
परभणी आणि जालन्यात साधणार शेतकऱ्यांशी संवाद
(Uddhav Thackeray) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर असून 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करत असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधत आहेत.
धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार घेत असून आज उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे.
परभणी आणि जालन्यात उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जालनात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.