(11th Admission ) अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारी शिक्षण विभागासमोर उभा राहिला आहे. 4 जूनपर्यंत राज्यभरात 12.20 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, ज्यात मुंबई विभागातून 1.19 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाची सॉफ्टवेअर प्रणाली बऱ्यापैकी सुरळीत असली तरी, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी अद्यापही कायम आहेत. विशेषतः मुंबई विभागातील सीबीएसईच्या 'रिपीटर' विद्यार्थ्यांच्या तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.
शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 17 हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी आता केवळ 900 तक्रारी प्रलंबित आहेत. 5 जून हा प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिवस असल्याने या प्रलंबित तक्रारींमुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
श्रीराम पानझडे यांनी या संदर्भात सांगितले की, "राज्यातील 900 तक्रारी प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के तक्रारी सोडवणे हे आमचे काम आहे, आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही." एकंदरीत, अंतिम दिवसापर्यंत सर्व प्रलंबित तक्रारी सोडवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.