विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
यासोबतच मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून काल आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता.
त्यानंतर आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली असून आज काय भूमिका घेतली जाणार हे महत्वाचं असून अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या मागणीवर विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक होतील.