(SSC Result 2025) आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
सकाळी 11 वाजता शिक्षण बोर्डाची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येईल. यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते.
21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
mahahsscboard.in, sscboardpune.in या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल उपलब्ध होतील. या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि विचारलेली माहिती भरून निकाल पाहू शकतात.