थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maha Vikas Aghadi Meeting) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
मात्र ही बैठक पुढे का ढकलली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक आज होणार होती.
Summery
महाविकास आघाडीची आजची बैठक पुढे ढकलली
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बैठक पुढे
बैठक पुढे ढकलण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट