महाराष्ट्र

Tokyo Olympics 2020 | तिरंदाजीत अतानू दासची क्वार्टर फायनलमध्ये धडक

Published by : Lokshahi News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज (India's Archer) अतानू दासनं (Atanu Das) पुरुष एकेरी प्री-क्वार्टर्समध्ये धडक दिली आहे. अतानू दासनं दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियन तिरंदाजाला मात देत विजय मिळवला आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगल्याचं पाहायला मिळालं.

टोकियो ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारी तीन महिला क्रीडापटूंच्या कामगिरीने भारताला पदकाची आशा दाखवली असतानाच आज बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकी संघाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करत दोन क्रिडा प्रकारांमध्ये पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकलं आहे.

यापूर्वी अतानू दासनं राउंड ऑफ 32 चा सामनाही शूट ऑफमध्ये खिशात घातला होता. त्यानं राउंड ऑफ 32 मध्ये चिनी ताइपेचया तीरंदाज डेंग यू चेंग कोको 6-4 नं मात दिली. या सामन्यात जिंकल्यानंतर अतानू समोर कोरियन तीरंदाजाचं मोठं आव्हान होतं. जे अतानूनं दिमाखात पार केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर