महाराष्ट्र

खंबाटकी घाटातून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचाच! दोन तास राहणार बंद

खंबाटकी घाट दोन तास प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामकाजासाठी हा घाट बंद करण्यात आला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : खंबाटकी घाट दोन तास प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामकाजासाठी हा घाट बंद करण्यात आला आहे. सातारा येथील वेळेमधील बोगद्यांचे काम करण्यात येणार आहे. यामुळे आज दुपारी 2:30 ते 4:30 च्या दरम्यान करण्यात येणार आहे. प्रवाशांनी पर्याय मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

साताऱ्यात वेळे येथील खंबाटकी बोगदयाचे दुरुस्तीचे कामकाज आज दुपारी 2:30 ते 4:30 च्या दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे सातारा बाजुकडून पुण्याच्या बाजूकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग खंबाटकी घाट मार्गे करण्यात आला आहे.

जड वाहनांसाठी पुणे बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक दिलेल्या वेळेत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, असे आवाहन वाई उपविभागीय पोलीस अधिकारी आणि भुईंज पोलीस ठाणेमार्फत नागरिकांना आणि प्रवाशांना करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."