महाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकचा अपघात, 1 ठार 3 गंभीर जखमी

Published by : Lokshahi News

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला असून नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक पहाटे 4 वाजता 100 फूट खोल दरीत कोसळला.

या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने भरपावसात घटनास्थळी धाव घेऊन पहाटे 4 ते 7 पर्यंत च्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या 3 जणांना सुखरुप बाहेर काढले.

तर 1 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीम चे शाम धुमाळ,मनोज मोरे,दत्ता वाताडे अक्षय राठोड विनोद आयरे,लक्ष्मण वाघ,देवा वाघ,जस्सी यांनी 3 तास अथक प्रयत्न करून 3 गंभीर जखमींना वाचविण्यात यश आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा