भंडारा शहरात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकाच नंबरच्या दोन स्कूल व्हॅन आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र गेली अनेक महिन्यांपासून ह्या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र शहरात दोन गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभाग आरटीओ विभागाला याची साधी भनक सुद्धा नव्हती.
इतकच नाही तर या दोन्ही गॅस किट वर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या प्रायव्हेट स्कूल व्हॅन मध्ये घरगुती गॅस भरतांना दिसून येत आहे. याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे.
तर आता या संदर्भात या व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचा आरटीओ विभागाचे म्हणणे आहे. पण गेली अनेक महिने बिनधास्तपणे अधिकाऱ्यांच्या नाकाच्या खाली शहरात धावत होत्या इतकच नाही, स्कूल व्हॅन मध्ये लहान चिमुकले मुले देखील बसलेले असतात त्यामुळे एखादा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
यावरून असं निदर्शनात येते की भंडारा जिल्ह्यात आणखी किती वाहने एकाच नंबर प्लेटची धावत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे एका वाहनाने अपघात जरी झाला तर तो गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्या वाहनाला तोच नंबर प्लेट लावला जातो. पण हा सगळा प्रकार शहरात सुरू असून सुद्धा पोलीस विभाग, आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.