महाराष्ट्र

Watch Video; खेडमध्ये जंगली तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी

Published by : Lokshahi News

पुणे जिल्ह्यातील खेडमधील खरपुडी येथे जंगली तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात जेष्ठ नागरिक पांडुरंग जाधव आणि राहुल गाडे हा तरुण जखमी झालाय. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय.

या व्हिडिओमध्ये जेष्ठ नागरीक पांडुरंग जाधव रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरत जखमी केले, एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने पांडुरंग जाधव सुदैवाने बचावले. तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल गाडे यांना देखील चावा घेत जखमी केले आहे. जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यासोबत जंगली तरसाचा देखील हल्ला सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा