महाराष्ट्र

अमरावतीच्या जामडोल येथे वीज पडून दोघांचा मृत्यू; चौघे बचावले

अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला.

Published by : Shweta Chavan-Zagade

अमरावती/ सुरज दाहाट : अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला. यात शेतात काम करत असलेल्या ६ जणांच्या अंगावर वीज पडली. यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर यात चार जण सुखरूप बचावले.

किशोर भगवान पाटील वय४२ व अविनाश श्यामराव निबोंरकर वय ३२रा.दोघेही करजगाव ता.अमरावती असे मृतकाचे नाव असून प्राप्त माहितीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता सदर प्रकार घडला,मृतक शेतकरी किशोर पाटील हे जामडोल येथे बऱ्याच वर्षा पासून शेती मक्ताने वाहीत होते, नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात मजूर घेऊन गेले होते,पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्व सहाही जण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ही घटना घडली, तर यात एक जण किरकोळ जखमी सुध्दा झाला, घटनास्थळी माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचारी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा