महाराष्ट्र

मुंबईतील अँटॉप हिल येथे बेपत्ता झालेल्या दोन भावंडांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

मुंबईतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कारमध्ये 7 आणि 5 वर्षांच्या दोन भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

Published by : shweta walge

मुंबईतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कारमध्ये 7 आणि 5 वर्षांच्या दोन भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिस संभाव्य निष्काळजीपणाचा तपास करत आहेत. प्राथमिक शवविच्छेदन गुदमरल्यासारखे सूचित करते.

बेपत्ता असलेला 7 वर्षांचा मुलगा आणि त्याची 5 वर्षांची बहीण बुधवारी रात्री 10 च्या सुमारास अँटॉप हिल येथे एका कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. साजीद शेख आणि मुस्कान ही मुले इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती, जसे की ते नेहमी करत होते, मात्र, बराच उशीर होऊनही ते घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. दोघेही कुठेच न सापडल्याने त्यांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार देखील नोंदवली. मात्र, एका व्यक्तीला मुस्कान आणि साजिद एका कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. यानंतर पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मुलांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा दरवाजा आतमधून लॉक झाल्याने मुलांचा गुदमरून मृत्यू , असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आपघाती मृत्युची नोंद केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत. मात्र, या घटनेने शेख कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा