विकास माने | बीडमध्ये गोदावरी नदी पात्रात बुडुन दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घड़ली आहे. नेहा कोरडे आणि अमृता कोरडे असे मृत झालेल्या दोन्ही मुलींची नावं असून, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
बीडच्या गेवराई मधून एक हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. राक्षस भवन येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात दोन सख्ख्या बहिणींचा बुडुन मृत्यू झालाय. या दोन्ही बहिणी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. माञ पाण्याचा अंदाज न आल्यानं सदरील घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. नेहा कोरडे आणि अमृता कोरडे असे मृत झालेल्या दोन्ही मुलींचे नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.