महाराष्ट्र

Uday Samant : शपथविधीपूर्वी उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

Published by : Siddhi Naringrekar

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज 5 डिसेंबर 2024ला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. आज शपथविधी सोहळा होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमधून प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्यनेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती, आजही आहे. त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की, आमच्या 59 आमदारांपैकी कोणीही मी ठामपणाने सांगतो की, उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही. हा मनात देखील विचार केलेला नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच उपमुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं गरजेचे आहे.

आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की, एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही, कुणावर तरी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न जर शिंदे साहेबांनी केला तर ती आम्ही देखील स्विकारणार नाही. या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्रीपद स्विकारतील. महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत. त्याची अंमलबजावणी कायमस्वरुपी करण्यासाठी ते स्वत: देवेंद्रजींना ते सहकार्य करतील. एकत्र बसून महाराष्ट्रातील सर्व निर्णय होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनात मानतो. आमचे सगळ्यांचे राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना डावलून कोणतरी काही करत असेल आम्ही गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावे ही आमची कायमस्वरुपीची भूमिका आहे. आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे. ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.असे उदय सामंत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा