थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uday Samant) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. यातच पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. उदय सामंत तातडीने पुण्यात दाखल होणार असून काल पुण्यातील 60 हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्म वाटले. मात्र रात्री मुंबईतून युतीचा निरोप असल्याने पुण्यात नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.
शिवसेना आणि भाजप युतीमध्येच लढणार अशी आता माहिती मिळत असून शिवसेनेने काल स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे 60 हून अधिकजणांना AB फॉर्म देण्यात आले. मात्र आता हे एबी फॉर्म पुन्हा मागवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उदय सामंत पुण्याला जाणार असून सामंतांच्या मध्यस्थीने जागा वाटपाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
शिंदेंनी सामंतांना तातडीने पुण्याला पाठवलं
पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम
सामंतांच्या मध्यस्थीने जागा वाटपाचा तिढा सुटणार?