थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray - Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज भेट होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3.30 च्या दरम्यान ही भेट होण्याची शक्यता असून या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज भेट होण्याची शक्यता
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा होणार