बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray - Prashant Jagtap) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध होता.
ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल त्यावेळी मी राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. यातच प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यातच आता प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा ९ मिनिट दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत असून उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता प्रशांत जगताप कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
उद्धव ठाकरे यांचा प्रशांत जगताप यांना फोन
रात्री उशिरा ९ मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती
उद्धव ठाकरे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर