महाराष्ट्र

उध्दव ठाकरेंची 15 आमदारांना भावनिक साद; पत्र लिहित म्हणाले, कोणत्याही धमक्या...

संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या 15 आमदारांना (ShivSena MLA) धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच शिवसेनेमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र याचदरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना (ShivSena MLA) धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार आहे.

या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात की, जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले.

आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे या पत्रात म्हटले आहेदरम्यान, ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही आदित्य ठाकरे यांच्यासह वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा