Uddhav Thackeray infected with corona 
महाराष्ट्र

"उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण"

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांच्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याशी संपर्कात असून ४४ पैकी ४१ आमदार बैठकीला उपस्थित होते. तर तीन आमदार मुंबईच्या दिशेनं येत आहेत, अशी माहिती दिली. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा