शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता ठाकरे लाईव्ह येणार आहेत.
मागील आठवड्यात राम मंदिराच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. यानंतर मुंबई भाजपाच्या युवा मोर्चाने शिवसेना भवनावरच मोर्चा काढला. याच वेळी सेनेचे आमदार सदा सरवणकर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत दाखल झाले होते. यावेळी सेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्री त्यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसोबत राम मंदिराच्या मुद्द्यावर देखील ते भाष्य करण्याची शक्यता आहे.